परतून तू येशील का ..........

Started by ankush.sonavane, August 10, 2011, 11:17:49 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

जिवनात येवून  जिवन फुलवून जाशील का
हृदयाच्या एका कोपऱ्यात घर करून राहशील का
परतून तू येशील का ....................................

     तहानलेल्या  चातकाची तहान भागवशील का
     पावसाची सर बनून त्याच्यासाठी येशील का
     परतून तू येशील का ..............................

आंधळ्यासाठी तू दृष्टी बनशील का
अडखळत चालणाऱ्याला आधार देशील का
परतून तू येशील का ..............................

     दमलेल्या या वाटसरूला कुशीत घेशील का
     जिवनाच्या वाटेवरती सोबत त्याच्या चालशील का
     परतून तू येशील का ..............................

माझ्या  श्वासात तुझा श्वास  गुंतवून ठेवशील का
जगण्याचा एक श्वास माझ्या तू बनशील का
परतून तू येशील का ..............................
                                     अंकुश सोनावणे

sindu.sonwane

परतून तू येशील का
Khup Chhan