"माझा ध्वज.....!''

Started by msdjan_marathi, August 12, 2011, 07:31:07 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

रस्त्याने चालताना व झेंडे उचलताना मन चरचरत.... आणि आपल्याही उंचीपेक्षा मन थिज होत....
नकळत आपल्याकडून झेंड्याचा व पर्यायाने देशाचा अपमान होतो.... त्यावेळी जे वाटत ते शब्दात मांडण्याचा छोटा प्रयत्न....
कृपया फक्त वाचू नका...... विचार करा.......हि नम्र विनंती......!
"माझा ध्वज.....!''
आता पुन्हा सभा भरेल, जागोजागी गर्दी जमेल...
लेवून तिरंगा अभिमानाने माझा देश पुन्हा सजेल...
ध्वजाला सलामी मिळेल, होईल भाषणांची रेलचेल...
मोफत वाटपाचा कार्यक्रम जमाव खेचेल...
लहानथोरांच्या हाती मग झेंडा मस्त लहरेल...
बिल्ले,टेटू आणि पट्ट्यांमधून सा-या शरीरभर बहरेल...
नाच,गाणी,ऑर्केस्ट्रा...साराच थाट सुरेल...
घरी औफिसबाबुंचा हॉलिडे हळूच सरेल...
मग होईल संध्याकाळ, झेंडा खांबावरून उतरेल...
दुस-याचदिवशी सकाळी सा-या फुटपातभर पसरेल...
काल हसत होता तो, तो आज रडेल...
गटारात,रद्दीमध्ये,कचराकुंडीत सडत पडेल...
मग विचारा त्या तिरंग्याला, त्याला कसे वाटेल...
ताठ मानेने फिरणारा, जेव्हा धूळ चाटेल...
ते युद्ध,ते समर,ते बलिदान त्यास आठवेल...
"व्यर्थ गेले रे रक्त सारे...." पाहून वर म्हणेल...
ज्यासाठी केली चाळण छातीची, त्या वीरांना हे कसे पटेल...
शरमतील त्यांचे आत्मेही, त्यांचेही काळीज आटेल...
'जय हिंद','जय भारत' म्हणून अखेर ध्वज निजेल...
पुन्हा येईल २६ जानेवारी, पुन्हा तेच घडेल...
कधी शमणार हे सारे, मला लाज कधी वाटेल...
पाहून विटंबना देशाची, माझे अंतकरण कधी दाटेल...?
                                                             ............महेंद्र   

केदार मेहेंदळे

पुन्हा येईल २६ जानेवारी, पुन्हा तेच घडेल...
कधी शमणार हे सारे, मला लाज कधी वाटेल...
पाहून विटंबना देशाची, माझे अंतकरण कधी दाटेल...?


kay bolu....... shbdch nahit

kedar