"भ्रष्टाचारी मंत्री सचेत व्हा..." …©.चारुदत्त अघोर(९/४/११)

Started by charudutta_090, August 16, 2011, 05:04:00 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"भ्रष्टाचारी मंत्री सचेत व्हा..." ...©.चारुदत्त अघोर(९/४/११)

पदाचा गैर वापर करून लोकांची,किती कराल दिशाभूल,
धेरपोटी स्वतः होता,काय जिथे थंडावली आहे चूल;
शांत आहे तिथवर ठीक,मुश्कील होईल जर जन-बुद्धी खोडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

साखर कारखाने उघडून किती जमवली इस्टेट स्तावर,
तोंड वाकडं होईस्तोवर,गैर्वापरीत केली पावर ;
कुठे पळणार आहात,जेव्हां जन शक्ती झोडेल;   
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

रिकाम्या पदी जागा भरण्यास,किती घेता लाच,
अहो हीच लाच द्यायची,तर का उघडणार नाही धंदा आज;
आज मूक गिळलेली लोकं,अवाजतील जेव्हां अंतर हाक ओरडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

शैक्षणिक क्षेत्रा सारख्या पवित्र क्षेत्री,पैशा शिवाय देत नाही दाखला,
अहो लज्जास्पद आहे देश-सेवक,इथेही कसा व्यवसाय थाटला;
स्वतः अंगठा बहाद्दर तुम्ही,का पुढे प्रजा तुम्हास निवडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

जे आज उपोषणी बसले आहेत,त्यांना थोडं तर व्हा सहायक,
का दाबून ठेवलं आहे ते,लोक पाल विधेयक;
नका अंत पाहू,आता लोकं शक्ती अझून वाढेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

खोकले भाषणं देवून,स्वतःला आदर्श म्हणवता,
आदर्श घोटाळे करून,वर भ्रष्टाचार ताणवता;
रावण रुपी तुम्ही,बाणंवाल जर रामरूपी पुनरावृत्ती घडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

जनतेचे सेवक म्हणवता,वर त्यांनाच फसवता,
वातानुकुलीत राहून,लोकास उन्ही तासावता;
कुठे पळाल जेव्हां,पाठी "त्याची" काठी पडेल;
भ्रष्टाचारी मंत्री हो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

खालच्या दुनियेशी हाथ मिळवणी व तुमचं सेटिंग,
मद्य पानी धुंदावून रात्री,कोणाशी असते मिटिंग;
उत्तान घुमणारे रत्न तुमचे,गुन्हेगारी त्यांची केव्हा झडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,

तडफदार तरुणांनो जागे व्हा,घ्या आता हाती शस्त्र,
या भ्रष्टाचारी पसरल्या वाळवीला, हेच एक अस्त्र;
हाणून पाडा यांना पदावरून,जे व्हायचं ते घडेल;
भ्रष्टाचारी मंत्रीहो सचेत राहा,जनताच तुम्हाला चाबकानं फोडेल...!,
चारुदत्त अघोर(९/४/११)