आणि तुझी आठवण

Started by Saee, August 17, 2011, 03:03:34 PM

Previous topic - Next topic

Saee

मुसळधार पाऊस  पडतो,
आणि तुझी आठवण येते,
पानां वरून थेंब ओघळतो
आणि तुझी आठवण येते.

लवलवतात पानं,
झाडहि मग शहारते
मी तिथेच असते उभी,
आणि तुझी आठवण येते. 

स्पर्श होतो पावसाचा
अन काळी लाजाळू ची लाजते,
मी असते स्वप्नांच्या वाटेवर,
आणि तुझी आठवण येते.

थांबते मग वृष्टी,
झहाडा खालीच विसावते,
चिंब भिजलेल्या वटवृक्षाची
ती शरणागती पत्करते.

हे पाहून तू हसतोस
मी तुझ्या हसण्याने सुखावते
मग कलता तू  नाहीसच  इथे
आणि तुझी आठवण येते

स्मृतींचा गंध ओघळतो
आणि तुझी आठवण येते
मी जाते तुला विसरायला
आणि तुझी आठवण येते.

mahesh4812


Pournima

मी जाते तुला विसरायला
आणि तुझी आठवण येते

Gyani

थांबते मग वृष्टी,
झहाडा खालीच विसावते,
चिंब भिजलेल्या वटवृक्षाची
ती शरणागती पत्करते.
खूपच छान.
सौमित्र(गारवा) ची आठवण झाली.

Saee

Dhanyawaad !! he khup encouraging compliment ahe.

राहुल

छान जमली आहे कविता. गुड लक.

केदार मेहेंदळे


Saee


sawant.sugandha@gmail.com

hi, khoop chaan.

आपल्या बरोबर कुणीच नाही,
म्हणून मन ही रडत असतं
अश्रूही थांबत नाही
ते फक्त तुझीच आठवण काढतात
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.

kay karnar

sawant.sugandha@gmail.com

मी जाते तुला विसरायला
आणि तुझी आठवण येते.

chaan