मी एक आग आहे....

Started by nphargude, August 18, 2011, 12:14:30 PM

Previous topic - Next topic

nphargude

मी एक आग आहे, माझ्या मनात खूप राग आहे..
सभोवतालच्या घटना बघून मनात खूप कल्लोळ माजला आहे.
काही तरी करायला पाहिजे हाच विचार मनात सारखा येत आहे.
मनाची आग विजवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत आहे.
डोके अशा घटना पाहून गरगरते आहे, समाजाला काहीच कशे वाटत नाही हे दुख आहे.
माझ्या मनातील क्रोध एक दिवस नक्की उफाळून येईल, पण तो क्रोध योग्य व्यक्तीवर म्हणजे भ्रष्टरूपी माणसावर काढण्याची मी वाट भागात आहे.
मनात माझ्या खूप आग आहे, ती शमवण्यासाठी मी योग्य वेळ शोधात आहे.
का असे होते आहे समाजामध्ये असला प्रश्न मला पडत आहे, काहीतरी करावे समाज्यासाठी हीच एक आस आणि इच्छा खास आहे.
दुरून मज्जा पाहू किंवा शोक मी पाळू शकत नाही आहे, कोणी का नसेना आपण बदलावे जगाला किंवा किमान आपल्या समाजाला असे आता वाटत आहे.
असे करण्यासाठी काही ताकत, शक्ती असावी लागते असे प्रत्येकजण मला सांगत आहे, मी मात्र माझ्या मतावर ठाम आहे.
आयुष्य भर काय फक्त पाहतच बसायचा समाजानं, आणि नको त्यांनी ओरबाडायचा अश्या समाजाला हे केविलवाणा दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही आहे.
काही तरी केलं पाहिजे अश्या समाजासाठी, म्हणून मनातील आग मी जपून ठेवत आहे.
नक्की एक दिवस मी समाजासाठी काहीतरी करणार आहे, फक्त नेत्यांसारखी आश्वासनं देऊन थांबणार नाही प्रत्यक्ष कृती करणार आहे.
अशी एक वेळ येईल जेंव्हा मी खरच  असे वागणार आहे, तेंव्हाच मनातील लागलेली आग बुजणार आहे.