मी अण्णा हजारे

Started by केदार मेहेंदळे, August 26, 2011, 01:15:28 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आण्णांच उपोषण चालू आहे आणि त्याच्या समर्थनार्थ प्रत्येक  जण काहीना काही करतोय. पण तरी खरच हे समर्थन आहे का?
कोणाच्या हि भावना न दुखवता मला वाटले   ते टीकात्मक पद्धतीनी लिहितोय.
कृपया कोणीही  ह्याचा अर्थ मला अण्णांन  बद्दल आदर नाही असा करू नये.  


कलियुगी पहा चमत्कार झाला
माणसा माणसातला भेद संपला
घालून टोपी प्रत्येक ओरडला
मी अण्णा, मी अण्णा.

वेशात जरी तयांच्या   विविधता
डोक्यावरी मात्र मुकुट सारखा
त्यावरी लिहिला एकची नारा
मी अण्णा, मी अण्णा.

करा चहा, नाश्ता, जेवण चोपून
टीव्ही वरी बघा अनशन सतत
म्हणा पडून बेडवर, होऊन सुस्त
मी अण्णा, मी अण्णा.

लावती नारा तेच स्वछ
सामील न होती ते भ्रष्ट
म्हणून ओरडा जोर करून
मी अण्णा, मी अण्णा.

संसदे वरी लोकपाल बसवा
पंत प्रधानाही  ठरवा चोरटा
सर्व श्रेष्ठ आता कोण, म्हणा
मी अण्णा, मी अण्णा.

पंचाहत्तरीचा वृद्ध भुकेला
दहा दिवसांत  किती खचला
मरो तिथे ते, तुम्ही ओरडा
मी अण्णा, मी अण्णा.

नकाच सोडू उपोषण आता
व्हाल जरी शहीद अण्णा
आहोत इथे आम्ही ओरडण्या
मी अण्णा, मी अण्णा.

अजून न नमले सरकार जरा
मरता अण्णा बसवणार कोणा
वाचवण्या म्हणून त्यांना ओरडा
मी अण्णा, मी अण्णा.

नमले न सरकार, करा चर्चा
कारण न दुसरा कोणी बसवण्या
आम्ही फक्त करणारे ओरडा
मी अण्णा, मी अण्णा.

करा चर्चा, काढा तोडगा
असा उपोषणी न गमवा
जाता अण्णा कसे ओरडू
मी अण्णा, मी अण्णा.

संपले उपोषण, संपली मजा
लोकपाल झाला इतिहास जमा
मजा मात्र ओरडण्यात आला
मी अण्णा, मी अण्णा.

केदार....

amoul