"सांजवेळा...!"

Started by msdjan_marathi, August 28, 2011, 03:52:26 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

( प्रस्तुत कविता जर "आला आला वारा...." या गीताच्या चालीत गाण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला नक्की आवडेल...!)

:) "सांजवेळा...!":)
झाल्या सांजवेळा...ऽऽऽऽ...संगे आठवांचा झुला...
आठवांनी केला पापण्यांचा काठ ओला... ॥ धृ ॥

येई डोळ्यांसमोर ती पहिली भेट...
ओशाळले नयन जेव्हा भिडले थेट...
न्हाऊनी गंधार्थ गेले....माझिया प्रितीफुला...!
झाल्या सांजवेळा...ऽऽऽऽ...संगे आठवांचा झुला...
आठवांनी केला पापण्यांचा काठ ओला... ॥ २॥

लाजण्याला तुझ्या मन भुललं...भुललं...
वाटेवरी तुझ्या रोज रुळल...रुळल...
नाना छंद...ह्रिदयी माझ्या तुझाच नाद खुळा...!
झाल्या सांजवेळा...ऽऽऽऽ...संगे आठवांचा झुला...
आठवांनी केला पापण्यांचा काठ ओला... ॥ २॥

सारं संपलं आता, तो काळही लोटला...
सुटली साथ तुझी, हाती पदर सुटला...
झडली पाने....पाण्याविना हा तरूही खंगला...!
झाल्या सांजवेळा...ऽऽऽऽ...संगे आठवांचा झुला...
आठवांनी केला पापण्यांचा काठ ओला... ॥ २॥
                                                 ............महेंद्र :)


Gaurav Patil



amoul


Saee


dhruv deshmukh