का ग सये

Started by Saee, August 29, 2011, 11:51:38 AM

Previous topic - Next topic

Saee

का ग सये संकोचतेस,
अशी बोलाया माझाशी,
का ग सये पाऊले तुझी,
थबकतात येऊन दाराशी?

ओळख असे जुनीच अपुली,
तरीही नजर तुझी परक्याची,
कशी विसरलीस प्रिये ती भाषा,
ती भाषा अपुल्या नजरेची,

बोल बोलुनी कधी न थकलीस,
मी श्रोता तुझिया वचनांचा,
आणि आज तू सांग का धरला,
अतूट सूर हा मौनाचा?

तुझिया डोळी आज तरळते,
पाणी कसले सांग प्रिये?
तूच सोडीला हात मजपरी,
तव नयनी करुणा का दिसते?

वेचीत बसलो आज हि येथे,
त्या गतकाळाच्या आठवणी.
ओशाळलेली तू घडवून सारे,
मी शांत प्रेमात जाळूनही.

तरीही पहा मज सतावित आहे,
सवाल एकच क्षणोक्षणी,
भितेस का बोलाया मजशी,
जर होतो तुझाच मी केव्हातरी.


केदार मेहेंदळे


Saee


संदेश प्रताप

Kiti sunder ...chan shabd gumfalet :)

Saee