"आले रे गणराया....!" ©चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, August 31, 2011, 08:46:43 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"आले रे गणराया....!" ©चारुदत्त अघोर.
भाद्रपद मासी,चतुर्थी लक्षून,अवतरती जन ताराया,
पितांबर पिवळा,नेसुनी भरजरी,घेउनी लोड टेकाया;
मखर सजविती,माळ गुंफिती,स्वागत ते कराया,
वाजत,गाजत,मिरवत,नाचत,आले रे गणराया....!

सनई चौघडे,नगारे नादत,आतुरले जन गाया,
आदिनाथां,बुद्धिदाता,नावे रे किती घ्याया;
पायी घागर्या,हाती मोदक,सोंड साजिरी वळाया;
वाजत,गाजत,मिरवत,नाचत,आले रे गणराया....!

मुले नाचीती,मनी आनंदती,मिळे मोदक खाया,
भजनी रंगून,आरती गाऊन,पुष्पांजली अर्पाया,
दाही दिसांचा सण साजिरा,विनवून तुज थांबाया; 
वाजत,गाजत,मिरवत,नाचत,आले रे गणराया....! 

पुढल्यावर्षी लवकर येई,म्हणून वंदुनी पाया,
मनी हर्षून,जल्लोष करून,गहिवरती माया;
एका स्वरी गाती सगळे,बाप्पा रे मोरया;
वाजत,गाजत,मिरवत,नाचत,आले रे गणराया....!
चारुदत्त अघोर.(११/९/१०)

केदार मेहेंदळे