"गणपती बाप्पा मोरया...!"

Started by msdjan_marathi, September 01, 2011, 07:23:14 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

:'("गणपती बाप्पा मोरया...!" :'(

गल्लोगल्ली घेऊ आता गणेशाची भेट,
मंडळांच्या मंडपांनी नटतील बाजारपेठ...!
वर्गणी नाही देणगी... झाला अधिकारच थेट,
देणारे होती भिकारी पण घेणारे शेठ...?
नवसाच्या राजाला सोन्या-रुप्याच्या मोदकांची प्लेट,
आणि सोन पिकवणारा बळीराजा रोज झोपतो उपाशी पेट...?
दहा दिवसांच्या देवाला करोडोंचा सेट,
तर करोडो भक्तांची चार भिंतींसाठी वेठ...?
गरीब गणेश भक्तांची होई दर्शनासाठी रपेट,
आणि धनिक बाप्पाच्या लेकरांना V .I .P . गेट...?
कुठे आहे समानता...? हि कसली रे समेट...?
बाप्पाच्याही दरबारी सामान्यांचाच चेकमेट...?
                                             ........महेंद्र
[/center]

केदार मेहेंदळे

khrach mitra hlli devach kay nyay ahe smjt nahi.  agdi mazya mnatlya slnarya bhawna lihilya ahes.....