आदरांजली - श्रीनिवास खळे

Started by बाळासाहेब तानवडे, September 03, 2011, 09:16:00 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

आदरांजली - श्रीनिवास खळे

अबोल झालं आपलं गीत-संगीत आज.
हरवला जणू त्यांचा प्रिय स्वर- साज.

संगीत साज तुम्ही बहुढंगी  थाटला.
भाव भक्तीच्या सुरांनी कळस गाठला.

सुरात रंगला सारा मराठी जनलोक.
सवे  दंगला अजुनी अन्य भाषिक.

"अभंग तुक्याचे"   स्वर्ग सुरात  न्हाले.
"शुक्रतारा मंदवारा" मना-मनात राहीले.

मधुर सूरांच शीतल चांदणं पसरलं.
बहु गीतास सुंदर कोंदण  गवसलं.

सूर संगीताचे आपण फुलवलेत मळे.
लोकमान्य-राजमान्य तुम्ही श्रीनिवास खळे.

राहील सूर संगीत आपले अमर.
सूरांच देण हे कधी न फिटणारं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ०३/०९/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/


amoul

thanks for posting ............. je aaj mana-manat aahe te tumhi agadi uttam shabdat mandale.............

केदार मेहेंदळे


बाळासाहेब तानवडे