तू

Started by Saee, September 05, 2011, 10:47:05 AM

Previous topic - Next topic

Saee

तू हवेतला गारवा

तू फुलातला मारवा

तू मधाळ गंधाच्या

गुलाबातील गोडवा



तू स्पर्श्तील पावित्र्य

तू नवख्यातील नाविन्य

तू नसताना अनुभवते मी,

तुझ्या असण्याचा आनंद



तू शांतता नभातली

सळसळती वीज तू ढगातली

तू तान मधुर सुरातली

तू जिद्द माझ्या मनातली



तुझ्या असण्याचे अर्थ निराळे

तुझे नसणे जणू रिक्त रकाने

तुझ्या हसण्याची कैक कारणे

मज जगण्याचे तेच बहाणे



मी वटवृक्ष पसरलेला,

तू वाटसरू त्या वाटेवरला

तव पाऊल उठण्या पूर्वी,

मी सावल्या अंथरलेल्या

केदार मेहेंदळे