“शब्दांचं गुद-मरणं”© चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, September 07, 2011, 03:52:59 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"शब्दांचं गुद-मरणं"© चारुदत्त अघोर (३०/८/११)
मला प्रसन्न चित्ती बघायचं असेल,तर मला लिहू दे,
या साचल्या भावनांचं ओझं,शब्द रुपी वाहू दे;
मी नाही बोललो तर, कशी तू त्रास देते,
तुझ्या त्रासापरीच या,साचल्या शब्दांची रास होते;
त्या भावनांना जितकं दाबलं,तेवढी त्यांची भरती येते,
ती ओहोटायाला,शब्द कोरणारी लेखणीच, स्फूर्ती देते;
जेंव्हा ते जमले भाव,एकत्रित होऊन जमाव धरतात,
अशक्य होत गं त्यांना सांभाळणं,असा तणाव करतात;
प्रत्येक भाव वेगळाच मूड घेऊन येतो,जसा मर्जीचा मालक,
हर एकाला न्याय द्यावा लागतो,कारण मीच त्यांचा पालक;
जसा त्यांच्या मागण्यांचा,मनी जमतो घोळका,
शब्द रुपी त्यांना रेखाटलं,कि ओळी विखरतो टोळका;
तुला खरंच कसं कळणार,लेखन म्हणजे,माझं काय आहे,
जसं साचले भाव माझे आपत्य आणि मी त्यांची माय आहे; 
हे कधी येतील मनी,ना खात्री, न वेळ, न काळ आहे,
निघते शब्दच जसे मोती,व ओळ त्यांना गोवली, माळ आहे;
यांना बाहेर नाही काढलं तर जसं,...खाल्ल्या अध-मरणी,हाय असतं,
तुला कसं गं सांगू,साचल्या शब्दांची,....श्वास गुद-मरणी,काय असतं...?!
चारुदत्त अघोर(३०/८/११)