सदरक्षणाय खलनिग्रहणाय

Started by Rushi.VilasRao, July 25, 2025, 11:16:54 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आहे म्हणे तो जनतेचा रक्षक पण तोच ठरतो खरा सर्वसामान्य जनतेच्या सुखाचा भक्षक....
कायद्याच्या नावाखाली बक्कळ पैसा कमावला जातो...
सरकारी खात्यात जमा होणार सांगून स्वतःच्या खिशात खुशाल कोंबला जातो....
त्याने मारलेल्या फाइनला कायद्याच्या धाकाचा सुगंध कमी आणि बेईमानीचा उग्र दर्प आहे,
त्यात समजून घ्यायची, समन्स द्यायची भावना नाहीशी तर चिरीमिरी मिळवण्याचा ध्यास आहे,
तक्रार करायला आल्या वर पिढीत्याला कमी आणि गुन्हेगाराला जास्त अभय आहे,
स्वतःच्या घरच दरिद्री मिटवायला आणि समाजसेवेच्या भावनेने हाडाची काड करून भरती झालेला तो चिरीमीच्या नादात बदनाम आहे,
सिग्नल वर थांबून कर्तव्य बजावायचं ठेवून किती तरी मिटर लांब झाडाच्या किंवा गाडीच्या मागे लपून चांगलाच लावला त्याने सापळा आहे,
अरे रावीची भाषा वापरून लोकांना त्रास देतो कारण वर्दी अंगावर असल्या मुळे त्याला वाटत कायदा आपल्या बापाचा आहे,
घेतो सरकारी पगार म्हणून काम करण त्याला बंधन कारक आहे पण केलेल्या चुका दाखवून दिल्या की रुबाबाला बट्टा लागेल म्हणून राग येन सहाजिकच आहे...
कायद्यात संरक्षण असल्या मुळे बडतर्फीची त्याला काळजी नाही....
सदरक्षणाय खलनिग्रहणाय ची शपथ आता त्याझ्या मनाला रुचत नाही...