न सोडवता आलेला गुंता

Started by amoul, September 10, 2011, 01:06:07 PM

Previous topic - Next topic

amoul

आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपासबाहेर  काढली,
आणि   मग  college मधल्या  कितीतरीआठवणी  जाग्या  झाल्या.
ते  तुटलेलं  टोपण,  छोट्या  डब्बीचंढाकण,
काळवंडलेला  खोडरबर,  थोटकीपेन्सील,
छाप  पुसटलेली  इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची  लेस, पिक्चरच,  बसच  जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलंआणि  किती काय.
आणि   हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून  आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी  तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर  जायला  लागल्यापासून  या  साऱ्या  आठवणी  याच कंपासमध्ये  बंद केलेल्या,
त्या  आज उघडल्या,
.
.
ते  दोन धागे  एकमेकांतगुंतले  होते,
गुंता  इतका  होता  कि  टोकं  खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार   प्रयत्न  केला पण गुंता  कायसुटेचना,
आणि त्या  पायी  मलाही  काही  सुचेचना,
धागे   तोडण्याशिवाय  पर्याय नव्हता.
.
.
तुझ्या   माझ्याबाबतीत  देखील असंच  झालं होतं,
दोन  अनोळखी  धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो  ते  कळलंच नाही,
आपल्या   दोघांना  जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण  समाजाला,  घरच्यांना  ते  मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू  पाहिला  तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी  माझी  गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना   प्रयत्न झालेपणत्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती   गाठी  मारून स्वतःला  जोडलं  आहे  तू  आणि  मी , हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"    या  शुद्र  संकल्पनेवर   थुकावसं  वाटून  देखील,
त्या  समोर झुकावं लागलं  याची   खंत  वाटते आज.
.
.
मी   ते(निदान)  दोन घागे तसेच  ठेवले,
कंपास  बंद  केली आणि  झोपून   घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh  "  होऊन.

.....अमोल

sharktooth19


संदेश प्रताप


केदार मेहेंदळे