"रात गेली...!"

Started by msdjan_marathi, September 10, 2011, 11:21:54 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

:'("रात गेली...!":'(

देऊन स्वप्न गुलाबी... लाजून रात गेली,
प्याले नशीले शराबी... पाजून रात गेली...
मिणमिणत्या दिव्यांना... विझवून रात गेली,
चाहूल कोरडी सखीची... खिजवून रात गेली...
वेचून चंद्र-तारे... फसवून रात गेली,
आणून रोमी शहारे... हसवून रात गेली...
उमेदल्या रातकळ्यांना... फुलवून रात गेली,
मनमनास धुंद दवात... भुलवून रात गेली...
स्पर्शून ह्या तनुला... खेटून रात गेली,
ह्रिदयात साजनीला... भेटून रात गेली...
दावून शांत किनारे... फितवून रात गेली,
मग वा-याच्या शीळेने... चिथवून रात गेली...
गाणे एकल्या दिलाचे... गाऊन रात गेली,
चोरून भाव मुखीचे... पाहून रात गेली...
दंशांनी सहस्त्र डंखांच्या... रडवून रात गेली,
मज भोव-यात खोल तमाच्या... बुडवून रात गेली...!
                                                          ....... महेंद्र :'(