आठवणी

Started by sameernmojad, September 11, 2011, 07:32:11 PM

Previous topic - Next topic

sameernmojad

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी .

केदार मेहेंदळे

mast...... te divas parat yet nahitach..... mhanun ase kavitetun athvayche...

manoj vaichale

फक्त आठवणी

sameernmojad

धन्यवाद मित्रानो तुमच्या प्रतिसादासाठी ........  :)