म्हणे स्वातंत्र्य आहे...!

Started by Sanket Shinde, September 14, 2011, 04:37:52 AM

Previous topic - Next topic

Sanket Shinde

हिंदुस्थान झाला स्थापन घेऊन नवी उमेद
आली सत्ता स्वतःची, आता काही ना भेद

आता भोग सरतील, होतील आनंदी सारे
स्वातंत्र्य मिळवलं अखेरीस वाहून रक्ताचे झरे

स्वप्न रंगवून सारेच सज्ज हाथी जरी ना दमडी
परी मतभेद उसळले पाहून वर्ण, जात अन चमडी

स्वातंत्र्यसैनिकांनी घडवली क्रांती प्रसंगी देऊन प्राण
स्वार्थी, नीच देशद्रोह्यांना करून मोकळे रान

वर्षांमागून वर्ष गेली परी सुधारणा ना झाली भारी
"सरकार" नावाचे दैत्य माजले तोडून बंधने सारी

साठी होऊन गेली तिरंग्याची पण किंमत ना कोणा त्याची
रंगांपलीकडे त्याचा अर्थ उतरेना कोणाच्याही जिव्हारी

त्याला मिले मनमुराद मेजवानी फक्त दोनच दिवशी
इतर वेळेस मात्र भिकारयाहून तोच जास्त उपाशी

सर्वांसाठी तो एक परी त्याच्यासाठी ना कोणी
विकला गेला तो हि बाजरी हाथी काही क्षुल्लक नाणी

काय मिळाले भारतमातेला, तीझेच लचके तोडणारी पिठी
तरुणवर्गाला हवीच आहे दारू, सिगारेट किंवा बिडी

संविधानाने स्वातंत्र्य दिले परी हक्क ना दिला जगण्याचा
कृषिप्रधान देशात शेतकरीच घेतो निर्णय जीवन संपवण्याचा

याच भारतात वावरताना भीती वाटे मरणाची प्रत्येक क्षणी
बॉम्बचे हल्ले रोजचेच झाले "सरकार" मात्र झोपले रणी

दारिद्य, बेकारी, लाचारी, गुंडागर्दी आणि बलात्कार
वरील सर्व गुन्हे नाही नेत्यांचेच हे सारे चमत्कार

"अण्णा हजारे" नावच वादळ आणू पाहतय वाटणीवर लोकशाहीला
आणून रस्त्यावर, मारून फटके पोट सुटलेल्या दडपशाहीला

देव करो, हा प्रयत्न सफल होवो...
बलसागर भारत माझा विश्वात शोभूनी राहो...!

...संकेत शिंदे...

केदार मेहेंदळे

बलसागर भारत माझा विश्वात शोभूनी राहो...!
छान...