"मला ओळखलाच नाहीस"© चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, September 16, 2011, 01:16:25 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"मला ओळखलाच नाहीस"© चारुदत्त अघोर. (२७/८/११) 
एकदा  मी तुला पाठी टेकला असता तू विचारलेलं...
मला तुझ्यातला तू पहायचा आहे..!
मी म्हंटल..ते या जन्मी शक्य नाही..
त्यावर तू पाठ वळवून माझा चेहेरा दोन्ह्यी पंजी कौन्सात धरून म्हणालीस..
का?
मी म्हंटल..आधी तू मलाच तर नीट ओळखला नाहीस..!
तू म्हणालीस मी तुला चांगल ओळखते...मी म्हणालो शक्यच नाही..
तू वादलीस..असं का म्हणतो..?
अगं खरं तेच सांगतो..!
वरपांगी दिसणाऱ्या कोरड्या मीचा, तू ओलावा ओळखतेस..?
असंख्य भावनांनी झाकल्या हृदयी,शिम्प्लीत मोत्याला का तू ओळखतेस...?
जरा चिडक्या स्वभावातल्या माझ्या,हळव्या मनाला का तू ओळखतेस...?
माझ्या एकाकी स्वभाव रात्रीतल्या,पौर्णीमित मधु चंद्राला का तू ओळखतेस...?
लोकांशी कमी बोलतो म्हणून चिडणारी तू..माझे शरीर संवाद का तू ओळखतेस...?
खूप कमी मित्र असलेला मी,माझ्या वैचारिक नभातल्या मित्र चांदण्यान्ना तू ओळखतेस..?
माझ्या मखमली पुरुषी छातीवर डोकावते,पण त्या मागलं,प्रणयी शेवाळ ओळखतेस..?
माझ्या रसाळ जुळ्या ओठांवरच्या चुप्पिला,कधी नजरेतल्या बोलत्या शब्दी ओळखतेस..?
तुला थांबण्यास आग्रह नाही करत यास चिडणारी,माझ्या हाथ-मुठी व्याकूळ विनवणीस तू ओळखतेस..?
असंख्य तुझ्या प्रतिमा मनी चित्रित रेखाटणार्या,रसिक चित्रकाराला का तू ओळखतेस..?
कधी "ड्रिंक"ची जरूर नसलेला मी,माझातल्या "तू-मय" नशा धुंदीला,का तू ओळखतेस..?
तू दिलेला "डीओ"नाही वापरत म्हणून रागावणारी,माझा श्वास गंध का तू ओळखतेस...?
नाही ना...?
तू माझ्या फक्त देखण्या देहाला मोहून,त्याच्या कवचाला भाळलीस ..!
आज या संवादी स्वतःतली प्रेयसी जागवून,प्रणय भावनी चाळलीस.;
दुसर्या दिवशीच्या आपल्या भेटीत,तुझा कालचा भाव पार काळोखला;
आणि आज.... तू खर्या अर्थी माझ्यातला "मी" ओळखला....!
चारुदत्त अघोर.(२७/८/११)