स्वप्नातलं घर

Started by mkapale, July 31, 2025, 07:56:28 PM

Previous topic - Next topic

mkapale

स्वप्नातलं घर

तुझं-माझं नातं, चार डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्नफूल,
दोघांनी जगायचं, जसं सोबत टाकलेलं पाऊल.

हातातला हात तूझा, एकत्र जग जिंकावसं वाटायचं
पाहिलेलं सुंदर स्वप्न, रोज थोडं थोडं साकारायचं

भिंतीवरचा रंग सोबत निवडलेला होता,
घरातला प्रत्येक कोपरा दोघांनी सजवला होता.

थोडा विसावा घेतला, आणि पावलांची झाली चुकामुक,
तू दूर जाताना, माझ्या अश्रूंमध्ये शोधत गेलीस चूक.

आता माझ्या सोबतीला ती स्वप्नं आहेत आणि हे घर,
कसं सांगू तुला, आजारात माझा आत्मा होतोय बेघर?

तुझा संसार फुलवायला सांगितलं नाही आधी कधी,
आपलं स्वप्न तू पूर्ण करतेस, पाहून घेतली ही संधी.

मी गेल्यावर तुला कळेल, तू हेलावून जाशील जेव्हा,
ही कविता माझ्या प्रेमात गुंफलेली, उमेद देईल तेव्हा.

ती स्वप्नं, ते जीवन, सगळं जगायचं ठरलं होतं तसं,
मलाही वाटेल मग, तुझं सुंदर जग....अगदी आपलंसं