प्रेमाची भूमिती

Started by काव्यमन, September 21, 2011, 11:06:40 AM

Previous topic - Next topic

काव्यमन

प्रेमाची भूमिती

माझ्या प्रेमाच्या वर्तृळाची
अनंत त्रिज्या आहेस तु
मोजता येई थोडे,
अशा समीकरणाची
व्याख्या आहेस तु,
नाही आपल्या प्रेमात समांतर रेषा,
ज्या नेहमी जुळती,
अशा तिरक्या रेषा
चौकोन षटकोन कधी न प्यारी
आमच्या प्रेमाची भूमितीच न्यारी

                         -काव्यमन