त्या दिवसांची सोबत

Started by mkapale, August 05, 2025, 01:00:18 PM

Previous topic - Next topic

mkapale

त्या दिवसांची सोबत

दिवस सोन्याचे, तू देखणी, मीही रांगडा,
गुणांचा जुळतोय, जणू ३६ चा आकडा.

जीवन आहे मस्त, धुंद, स्वछंद आसमंत,
सुबत्ता-आनंद ह्या क्षणांचा नाहीये अंत.

स्वर्गसुखाची प्राप्ती होतेय दिवस-रात्र,
सोनेरी-चंदेरी, लखलखीत वैभव सर्वत्र.

मन भरारी घेतंय, स्वप्न मी फुलवतोय,
संसार किती तो मधाळ, गोडवा देतोय.

आज आहे रंगलेला, उद्या उगवला काळा,
साथ देशील का जर, लाभला रुक्ष उन्हाळा?

दिवस हे मंतरलेले, विरून गेले कधी,तर
हातात हात घेशील का, विखुरले जीवन जर?

संकटे, विरह, त्रस्त झालेले शरीर असताना,
त्या दिवशी सोबत हवी, मी सक्षम नसतांना

तूही कोमेजशील कधी, थकशील, रडशील,
त्या दिवशी तू मला, तुझ्या पुढ्यात पाहशील.