मधुर भेट................

Started by mrralekar, September 22, 2011, 01:22:31 AM

Previous topic - Next topic

mrralekar

मधुर भेट................

कातर वेळ ही, मन हलवून जाई,
उनाड चंद्र ही, स्वछनद ढगाण  सोबत लपछुपी खेळतोय,
जणू तोही आज आपल्या पहिल्या मधुर भेटीस जळतो आहे,
कदाचित तो ही आज आपल्या चांदण्यानं आठवतोय आहे,
निशब्द तू ही, निशब्द मी ही,
निशब्द पणे फक्त एकटक बघावेत,
तुझ्या भिरभिरनर्या काळ्या बुभुळ्यानचा, पाठलाग माझ्या डोळ्यांनी करावा,
स्वछ, सतेज, टपोरे नेत्र तुझे ते,
तुझाच मनातील कल्लोळ मला सांगून जावा,
शांत वारा तुला काही सांगतोय खरा,
पण माझ्याच मनातील भाव तुला कळून सुधा नं कळावा,
मिठीत माझ्या फक्त तूच असावीस,
उष्ण स्वाश तुझा, रोमांचित शहारे जागवून जावे,
नखशिकांत भिजून प्रेमाने शांत चित्त मान व्हावावे,
निशब्द असूनही नेत्र मात्र बोलावेत,
मानाने मानस साध घालावी,
जशी स्वप्न लोकी प्रीतीस प्रीत भेटावी,
मग मात्र तू जडावल्या पावलांनी निघून जावीस,
पाऊलखुणा मात्र माझा मनात उमटवीत जावीस,
मी मात्र तुझ्या असेच तुझा आठवणी सांबाळंत जगावे,
परत आपल्या मधुर भेटीची वाट  बघात जगावे.


तुमचा मित्र,
मेहर राळेकर.