लक्षात घे!

Started by pralhad.dudhal, September 23, 2011, 07:09:31 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

लक्षात घे!
अत्तराच्या कुपीमधेच,
.......वेळी अवेळी....
कामाला यावे म्हणून...
विष ठेवण्याची तुझी कल्पना!
.........फारच आवडली!
फक्त आवडली नाही....
......तुझी मनिषा....
...जमलंच नाही जर,
सुगंध पसरवणे तर...
कालवायचे  विष!
पण लक्षात घे.....
अगं स्नेहभरल्या नजरेने..
तिरस्कारही बदलतो प्रेमात!
मग तुझ्याकडील विषाचे...
अमृत व्हायचं का थांबणार आहे?
         प्रल्हाद दुधाळ.