"प्रेमगाणे गायचे...!"

Started by msdjan_marathi, September 24, 2011, 05:29:13 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(माझ्या सर्व प्रेमवीर मित्रांसाठी हि कविता.....! पण ती शब्दश: घेऊ नका... हि विनंती....! आणि आवडल्यास अभिप्राय जरूर द्या...!)

;D"प्रेमगाणे गायचे...!";D

प्रेमगाणे गायचे.. हो .. प्रेमगाणे गायचे...!  ......॥२॥
:-*
भाव अंतरीचे आपुल्या अंतरात घोळायचे...
होऊनी तृणपाखरू वा-यासंगे डोलायचे...
जीवनातल्या रिमझिम सरींना दूर ना सारायचे...
ओलेचिंब होऊनी प्रेमसागरी डुंबायचे...
प्रेमगाणे गायचे.. हो .. प्रेमगाणे गायचे...!  ......॥२॥ :-*

जग हे रुसले तरी प्रेमास ना रुसवायचे...
खंतीलेल्या प्रियास निखळ, निर्मळ हसवायचे...
रोखू पाहील हे जग तरी वेड्या मनास ना रोखायचे...
चुकल्या जरी दिशा सा-या परि ध्येय्य ना चुकवायचे...
प्रेमगाणे गायचे.. हो .. प्रेमगाणे गायचे...!  ......॥२॥ :-*

तलम गुलाबी रेशीमधागी साजणीस गुंतवायचे...
ओढीने मग मनमनाच्या गुंत्यात त्या गुंतायचे...
विसरुनी हे विश्व स्वप्नी आगळ्या जगी जायचे...
स्वर जे ऊरी-कंठात आपुल्या गीतात गुंफून गायचे...
प्रेमगाणे गायचे.. हो .. प्रेमगाणे गायचे...!  ......॥२॥ :-*
                                                                            ..........महेंद्र ;D



केदार मेहेंदळे


radheyjoshi

आवडले तर अभिप्राय द्याचा आणि  नाही आवडले तर kay लिहायचे कृपया सांगाल का

mrralekar