फक्त दुख:च खंर......

Started by maddyloveu, September 24, 2011, 09:10:06 PM

Previous topic - Next topic

maddyloveu

आजही मी बसनेच जातो,
माघचीच सीट आडवतो,
येताना आणि जाताना,
तिकीट पण दोनच काढतो,

आजही मी पिच्चरला जातो,
कॉर्नर सीट च्या दोन तिकीट काढतो,
पिच्चर बाजूलाच राहतो,
त्या अंधारात मी तुलाच शोधत असतो,

आजही मंदिरात जाताना,
मी तुझाच हात शोधत असतो,
देव न मानणारा मी,
आता दर मंगळवारी ओटी देतो,

आजही जातो मी सीफेस कट्ट्यावर,
फिरत असतो एकटाच रस्त्यावर,
चालताना मात्र तुझेच विचार येतात,
झोपायचं म्हटल तर स्वप्नहि तुझीच पडतात.

सांग तुला विसरण्यासाठी मी काय करू?
तुझा आठवणीत जगू कि असाच मरू?
सारख मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बर,
सर्व सुख: खोटी असतात फक्त दुख:च खर
फक्त दुख:च खर.............

                                                  ..........मिथुन पाटील

केदार मेहेंदळे





Pandit Nimbalkar

premasathi kavita ki kavitesathi prem mahit nahi

Madhu143

Kharay tuza mitra...shevati dukhach khare aste parantu tya dukhatach sukha shodhyache aste he matra kadhi visarun javu nakos...