"बुबुळी चंद्र" © चारुदत्त अघोर (२९/८/११)

Started by charudutta_090, September 27, 2011, 04:59:39 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"बुबुळी चंद्र" © चारुदत्त अघोर (२९/८/११)
कधी एकदा शून्यात असता,कोणता क्षण मनी राहिला,
मिटल्या पापणी अंधुकसा,मी प्रकाश जसा पहिला;
डोळ्या तळवी,जणू एक,स्वप्नंच तो चाहुलला,
तीन्हीसांजी जणू तेवता,दिवाच तो पाउलला;
बंद झापडी,निळ्या रात्री,बुबुळी चंद्र, फिरुनी गेला,
भावना घन बंद पापणी,ओल्या गंधी,जीरूनी गेला;
तोच चंद्र नेत्र नभी,कडी थेंब,दवून गेला,
पौर्णिमा खुलवत,चांदण्या समवी,एक पापणी,लवून गेला
डोळ-पडदी,तोरणा आडी,हलकी ज्योत,तेवून गेला,
संथ क्षणी,मिटल्या शिंपली,इंद्र धनु लेवून गेला;
कोजागिरी दिवस समजून,पूर्ण आकारी,गोलावून गेला,
वाहत्या भावनि,दुधी उतावून,चिंब मज,ओलावून गेला;
तोच चंद्र,जो बुबुळी रुपी,काजळी रात्र,तेजावून गेला,
शुभ्र किरणी,श्वेत प्रकाशी,नजरी मजला,निजवून गेला;
नकळत ओल्या मिठीत तुझिया,उबित कुशी,आवळून गेला,
निरजी सडा पाहाटी शिंपून,रात्र माझी,मावळून गेला...!
चारुदत्त अघोर(२९/८/११)

shardul

Surekh !! shabdha rachna avadhli..ajun shrungarik baav hava hota asa mala vatta ahe..pan kavita over all mast ahe..