जरा माझे हि मन समजते का बघ ....

Started by ankush.sonavane, September 29, 2011, 03:01:41 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

डोळ्यातून  वाहणाऱ्या आश्रुना थांबवून बघ
त्वेषाने  वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श घेवून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ..............

      हासणाऱ्या चेहऱ्यापेक्षा दुख डोळ्यातील  ओळखून  बघ
      ओठातून निघणाऱ्या शब्दापेक्षा मनातील भावना समजून बघ
      जरा माझे हि मन समजते का बघ ..............

मिठ्ठीत आल्यावर  जाणीव होते का बघ
गुंतलेल्या श्वासात श्वास गुरफटून  बघ 
जरा माझे हि मन समजते का बघ ..............

     मृगजळामागे धावण्यापेक्षा उन्हाला निरखून बघ
     पौणिमेच्या रात्री सुद्धा चांदण्या दिसतात का बघ
     जरा माझे हि मन समजते का बघ ..............

ओंजळीतील  पाणी थांबवण्यापेक्षा  ओलावा जाणून बघ
नाते जोडणे सोपे असते पण जरा नाते टिकवून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ..............
                                 अंकुश सोनावणे

praveen.rachatwar