"तुझ्याशिवाय....!"

Started by msdjan_marathi, September 30, 2011, 12:46:05 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

( 'त्याच्या' आयुष्यातली 'ती' भर संसारात त्याला सोडून गेल्यावर त्याचे व त्याच्या संसाराचे होणारे हाल इथे मांडण्याचा छोटा प्रयत्न...!)

:'("तुझ्याशिवाय....!"
:'(
कसं तुला सांगू गं..? कळतंय पण वळत नाही...
तुझ्याशिवाय जगताना माझं पानसुद्धा हलत नाही...! ॥
:'(

कपाटातला शर्ट कधी हातालाचं लागत नाही...
लागलाचं तर त्याची आणि पँटची सागडं जुळत नाही...
किचनमधली भांडीसुद्धा एकमेकांशी भांडत नाही...
कढून गेलेलं दूध टोपाबाहेर काही सांडत नाही...
जेवताना हुंदके आणि अवंढ्यांशिवाय बाकी गिळवतं नाही...
हातातल्या बॅगेचाही भार मला पेलवत नाही...
कसं तुला सांगू गं..? कळतंय पण वळत नाही...
तुझ्याशिवाय जगताना माझं पानसुद्धा हलत नाही...! ॥
:'(

तेजू म्हणते, पप्पा तुला वेणी-फणी येत नाही...
'आई किती छान गाते... तुलातर अंगाईही जमत नाही...!'
ती सारखी तुला विचारते... तू नाही आहेस तिला सांगवत नाही...
'बोल ना रे आई कधी येणार...?' तिच्या प्रश्नांना आता टाळवत नाही...
कसाबसा तिला झोपवतोय... पण पापणी माझी लवत नाही...
एरव्ही वा-याला झुगारणारी ती समईही शांत तेवत नाही...
कसं तुला सांगू गं..? कळतंय पण वळत नाही...
तुझ्याशिवाय जगताना माझं पानसुद्धा हलत नाही...! ॥
:'(

नेहमी तुला निहाळणारा तो चंद्रही आत डोकवत नाही...
अवनीभोवती घिरटायला म्हणे मी आता विसरत नाही...!
अंगणातला प्राजक्तही पूर्वीसारखा दरवळत नाही...
हरवलीय कुठेतरी कुपी त्याची... पण, तो... ती शोधत नाही...
रोडावलेला दिवस तर जातोय... पण रात्र काही सरत नाही...
श्वास आहे म्हणून मी जिवंत आहे... त्याने 'मी जगतोय' असे ठरत नाही...!
कसं तुला सांगू गं..? कळतंय पण वळत नाही...
तुझ्याशिवाय जगताना माझं पानसुद्धा हलत नाही...! ॥
:'(
                                                              ..........महेंद्र

mohan3968