Mumbai

Started by madhukarsawant, September 30, 2011, 01:10:11 PM

Previous topic - Next topic

madhukarsawant

अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
जो तो उठ ! तो येतोय मुंबैत ,
माडी बस्तान इथ झोपडीत !
राहायला ना मिळे इथ घर ,
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
इथ भरलिया सोन्याची खाण!
नाही इथ कशाची ती वाण,
नाही इथ कुणाला म्हणाव
जो तो उठ तो मुंबैस धाव !
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
डोकेबाज मिळवी सहज खाण,
नाही इथ कशाची ती वाण,
याची झाली आहे ज्याला जाण
तो फिरे करुनी ताठ मान !!
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
इथला भिकारी आहे श्रीमंत
त्याला कधी ना उद्याची भ्रांत,
आगगाडीच्या डब्यात फिरुनी,
सहज मिळावी रुपये दोन - चार !!
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
इथे सिशिक्षित तरुण बेकार , त्यांना मिळे ना इथे रोजगार ,
त्यांची टोळकी उभी रस्त्यावर , नोकरीसाठी ती होती बेजार!!
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
जिकडे तिकडे बसतोय कॉम्पुटर , नाही मिळत हाताला काम,
रस्त्यावरी हि गाड्यांची गर्दी, चालायला नाही हो इथ वाव
अहो ! या मुंबईचं काय होणार ? जिथ तिथ होतंय गंगवार !
जिथ तिथ होतंय गंगवार !

कवी : मधुकर परशुराम सावंत
प्रकाशन : दशभुजा प्रकाशन

केदार मेहेंदळे

Kavita chan aahe. Pn mla vtat hi gambhir kavitet kinwa itar kavite madhe havi hoti ka?