दिवस मावळतीला आला...

Started by अविनाश सु.शेगोकार, October 03, 2011, 05:39:25 PM

Previous topic - Next topic

दिवस मावळतीला आला...

शुभ्र सकाळी आभाळ नटलेलं असतांना
नभ काळा आच्छादून गेला,
उजेडाची तमा ना बाळगता अंधार म्हणतो
आज दिवस मावळतीला आला...

हिरवळ चोहीकडे दाटली असतांना
दाहक वनवा शेकून गेला,
कोमेजलेली फुले-पाने म्हणाली
आज दिवस मावळतीला आला...

प्रश्नही  येथे उत्तरही येथे असतांना
प्रश्नांनी उत्तराचा पाठपुरावा केला,
केविलवाणी वाणी सावरत उत्तर म्हणाले
आज दिवस मावळतीला आला...

मेघ रिमझिम बरसत असतांना
चातक हा तहानून गेला,
पंखांना आपल्या कुशीत घेऊन म्हणतो कसा
आज दिवस मावळतीला आला...

दुःखाची जखम भळभळत असतांना
मन हास्याची लकीर सोडून गेला,
आपल्याच शैलीत हसून म्हणतो कसा
आज दिवस मावळतीला आला...

: अविनाश सु. शेगोकार
०३-१०-२०११