शाळा. . .

Started by pss, October 03, 2011, 06:08:30 PM

Previous topic - Next topic

pss

शेजारील पिंटुचे,काल मला दप्तर दिसले.
नकळत माझे मन मग,बालपणात गेले.

आठवले सर्वकाही,आठवली ती शाळा.
आठवला तो सुविचार लिहलेला,सुंदरसा फळा.

आठवला तो गणवेश,आठवली ती सॅक.
गळ्यात अडकवलेली,छोटीशी वॉटरबॅग.

आठवली ती प्रार्थना,आठवले ते जनगणमन.
सरळ रांगेत उभे राहण्याची,चाललेली चणचण.

पहिल्या बाकासाठी,झालेला मित्रांशी तंटा.
आठवली ती घणघणारी,मोठी पितळी घंटा.

आठवले ते दिलेले रोज,आईने आठ आणे.
मधल्या सुटटीतल्या खाऊसाठी,चिँच आणि चणे.

आठवला सरांचा तो,पाठीवरचा मारा.
आठवला वहीवरचा तो,लाल अपुर्ण शेरा.

आठवले ते शाळेसमोरील,मैदान स्वरुपी अंगण.
डब्बा खाण्यासाठी केलेले,सवंगड्यांचे रिँगण.

आठवले ते मैदान,आणि PE चा तो तास
फुटबॉल आणि क्रिकेटचा वेगळाच उल्हास.

आठवतात ते पाढे,आणि आठवते ती परिक्षा
कमी मिळाले गुण म्हणुन,केलेली शिक्षा

आठवतात ते गुरुजी आणि त्या बाई.
मित्रासोबत शाळेत जाण्याची,केविलवाणी घाई

अशी माझी शाळा,मला बालपणात नेते.
तिच्या आठवणिने डोळ्यात पाणि ठेऊन जाते

दिलेस तर देवा,एकच वरदान दे मला.
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला..
पाठीवरती दप्तर टाकुन,पुन्हा शाळेत जायचय मला...