अजूनही तो परका कसा ???

Started by अविनाश सु.शेगोकार, October 08, 2011, 07:35:38 PM

Previous topic - Next topic
अजूनही तो परका कसा ???

ओथंबलेल्या सागरातील
अलिप्त थेंब जसा,
क्षणोक्षणी एकाकी भासणारा
अजूनही तो परका कसा ???

गर्दीत हरविलेला
एक आवाज जसा,
आक्रोशात असतांना शांत भासणारा
अजूनही तो परका कसा ???

ताऱ्यांच्या घोळक्यात
एक तारा निस्तेज जसा
सतत जळणारा पण शीतल भासणारा
अजूनही तो परका कसा ???

आटलेल्या स्वप्नांच्या सागरातील
तडफडणारा मासा जसा,
निपचित पडलेला पण मृत भासणारा
अजूनही तो परका कसा ???

: अविनाश सु. शेगोकार
  ०८-१०-२०११

माझ्या इतर कविता व लेख वाचण्यासाठी www.spandan.tk ला भेट द्या !!!

:)