"तुझ्यावाचून...?"

Started by msdjan_marathi, October 10, 2011, 08:35:41 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(संक्षेप: सा-यांचा विरोध पत्करून 'ती' त्याच्याबरोबर आली...त्यांचं लग्न झालं.. आणि संसार सुरु झाला... पण काहीच महिन्यात त्याला कळले की त्यांना कधीच मुल होणार नाही... अचानक त्याच्यातला प्रियकर,पती..... हैवान झाला.... त्याने तिला घरातून हाकलवून लावले.... तिच्यावर जणू आभाळचं कोसळलं होतं...! तिने त्याला समजावयाचा प्रयत्न केला... पण तो अखेर तिला सोडून गेला... शेवटी त्याच्याशिवाय जगायची कल्पना असह्य झाल्याने तिने स्वताचं आयुष्य संपवले....!)
           "तुझ्यावाचून...?" :'(
दूर डोंगरापल्याड कुणी...
झुरझुर्...झिरझिर् गातंय गाणी...!
वारा वाहे एक विराणी...
तरुण दिलाची करुण बताणी...!
विहंग फिरतो...करतो पहाणी...
दिसतसे म्हणतो एक दीवानी...
मनवते सख्याला करते विनवणी...
सोडून जो चाले तिला अजाणी...!
विसरून जा म्हणे ही प्रेमकहाणी...
फेकून दे हरएक निशाणी...
विझवलीस तू माझी संसारधुनी...
वांझ असे तू... कूस तुझी सुनी...! :'(

ऐकून भंग दिल... निशब्द वाणी...
तुटून बांध डोळा वाहे पाणी...!
म्हणे नको जाऊ रे असा सोडूनी...
कसे जगू मी तुझ्यावाचुनी...?
तुचं जग माझे...या जगाचा स्वामी...
अर्थ नसे तुझविन जीवनी...!
तुझ्यासवे रे डोळे मिटुनी...
आले आप्तांचे बंध तोडूनी...!
झालास कठोर हा असा काहुनी...?
फिरतोस मागे सप्तपदी चालुनी...!
घेतल्यास आणां हाती हाथ घेउनी...
आणलीस मला तू फूस लाउनी..! :'(

नको सख्या रे जाऊ ह्या क्षणी...
तुझ्यातच बसते माझी जिंदगानी...!
पापणीत सदा आसवे ठेऊनी...
जगेन मी...सवत माझी आणि...!
नको देऊस जागा मज सदनी...
राहीन बनुनी मी तुळस अंगणी...!
पण...नको जाऊ रे मला टाकुनी...
जिवंतपणी हा जीव घेऊनी...! :'(

घेतले न त्याने ते काही ऐकुनी...
निघाला तिला दूर लोटुनी...!
काहूर माजला दहो-दिशांनी...
क्षणात ध्वस्त संसार पाहुनी....
सुन्नं मन... काही दिसे न लोचनी...
दिले तनुस तिने दरीत झोकुनी...!
संपली ती... अन् तिची प्रेमकहाणी...
प्रेमानेच केला अंधःकार जीवनी...! :'(
                                     ..............महेंद्र :'(