"तिला पहिले ना कधी...?"

Started by msdjan_marathi, October 12, 2011, 03:29:33 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(संक्षेप :प्रत्येक तरुणाची स्वप्नातली एक परी असते...! जगाच्या अपरोक्ष ती त्याला रोज दिसते,बोलते,भेटते.... पण......फक्त रात्री ....!! सकाळ होताच ती निघून जाते.... आळवावरल्या जलबिंदुसारखी....! एक स्वप्न असो वा भास.... पण त्यात ती त्याच्याजवळ असते....! केवळ त्याची असते...! त्या रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या छोट्याशा प्रवासात, त्याच्या मनाला ती कशी भासते...? याचा ठाव घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न....!)
:-*"तिला पहिले ना कधी...?":-*
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे,
तरी उमटले मनी... तिचे खोडकर ठसे...! ॥२॥
मन सैरभैर होई... घेऊ पाही रे कानोसे,
ठशाठशातून रुळे... तिच्या प्रेमाचे बाळसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ :-*

डोळे बोलकेसे तिचे... गूढ गुज सांगतसे,
रोखू पाहता डोळ्यांत... माझी नीज् पेंगतसे...!
देही वणवा सुलगावे... तिचे उष्णसे उसासे,
रानभूल टाकू पाही... कानी गुलाब इवलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ :-*

असा संभार केसांचा... रात माळलीली भासे,
मुखचंद्र आमावसेत... चांदण्यांचे तेज शोषे...!
खणखण कांकणांची... करी ईशारे जरासे,
पैंजणांची रुणुझुणु... देई स्वरांना दिलासे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ :-*

कुशीमध्ये विसावया... मी अधिक अभिलासे,
सात जनमांचे देतो... प्रिये तुला भरवसे...!
प्रहर सरता पहाटे... घेत जाई निरोपसे,
सोडू वाटे ना पदर... जिवा लागलेसे पिसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ :-*

दूर गेले धुक्यासवे... तिचे आळोसे-पिळोसे,
ओठी शर्कराचवाने... जणू पेरलेसे हसे...!
खंत वाटे ह्रिदयाला... ती रातीतच दिसे,
मग अखंड दिवस... खंड-खंड छळतसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥ :-*
                                             .....महेंद्र :-*

केदार मेहेंदळे


raghav.shastri

Sundar... Chan Kavita...

खंत वाटे ह्रिदयाला... ती रातीतच दिसे,
मग अखंड दिवस... खंड-खंड छळतसे...!
तिला पहिले ना कधी... तिचे रूप नाही दिसे ॥