रंग होईल सावळा

Started by soumya, October 15, 2011, 10:14:08 AM

Previous topic - Next topic

soumya

कोवळ्याशा  उन्हाच्या  लागतील  झळा,
रापेल  तुझा  रंग,  रंग  होईल  सावळा.

नको  फिरू  सजून  सवरून अशी  दररोज,
नकोस  ना  पाडू   तुझ्या  शृंगाराची  वीज,
थोडा  तरी फुलु  देना माझ्या  संयमाचा मळा.
कोवळ्याशा  उन्हाच्या  लागतील  झळा,
रापेल  तुझा  रंग,  रंग  होईल  सावळा.

उन्हामध्ये फिरताना  घे  ओढणी  डोक्यावर,
चेहऱ्यावरून फिरवुनी  बांध  मागे  गाठ सैलसर.
पण  उघडी  ठेव  ती  डोळ्यांची  किलबिलती पाखरं,
निदान  त्यांना  तरी  बघून मला  वाटेल  थोडं  बरं.
उन्हालाही सोसु  दे  तुला  ना  बघण्याच्या  कळा.
कोवळ्याशा  उन्हाच्या  लागतील  झळा,
रापेल  तुझा  रंग,  रंग  होईल  सावळा.

-------------------------------------------- सौम्य


केदार मेहेंदळे