तिचा स्वभाव

Started by किरण गोकुळ कुंजीर, October 15, 2011, 11:42:12 AM

Previous topic - Next topic
रोजचंच येणं, नि रोजचंच ज़ाणं
नेहमीचेच sms ,  नेहमीचच गाणं
माझ्या मनातील गुपीत तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

प्रपोज करताना 'can you marry me?'  म्हटलं
उत्तरात ती म्हणाली 'can' नाही ' will you marry me?' म्हणायचं
प्रश्नामधलं गांभीर्य तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

आई-वडिलांची आज्ञाधारक म्हणून नाही म्हटली
पण वागते तर अशी जणू खरच मला पटली
माझ्या भावनांचा होणारा गुंता तिला कसं कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

'माझा स्वभाव मलाच कळत नाही तर तुला कसा कळणार?' असं म्हणायचं
आणि स्वतःला चारचौघात नेहमीच लपवत राहायचं
मला सगळं कळतंय, हे तिला कसा कळत नाही?
तिचा स्वभाव, खरच उमजत नाही ||

                                किरण गोकुळ कुंजीर



केदार मेहेंदळे


mkhangan07