तुम्ही नका लावू टीव्ही, बंद करा त्या बातम्या

Started by soumya, October 22, 2011, 10:45:16 AM

Previous topic - Next topic

soumya

अहो  पुरे  झाल्यात  उठाठवाळ्या  जगाच्या,
बंद  करा  त्या  चर्चा  निकाम्या,
वाया  जाईल  रसरसलेली  ज्वानी,
जरातरी  लक्ष  तुम्ही  द्याना,
किती  सजून धजून  बसले  तुमच्यासाठीच  म्या,
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.

(कोरस)
करूनश्यान  कामधाम,  आवरून  सयमंपाक पाणी,
बाई झ्झाली  त्तयार  तुमच्या  साठी,
तुम्ही  हातपाय  धुवूनश्यानी, पिउनश्यानी  चहापाणी,
का  लागलात  टीव्हीच्या  पाठी,
दाजी  घ्याना  समजून,  आणा बाईला फिरवून,
थोड्या  समजा  जवानीच्या  उरम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.

दिसभर  मी  घरात  एकली  कुणी  नाही  बोलायला,
सांजेला  लाऊन  बसते  डोळे  तुमच्या  येण्याच्या  दिशेला.
लई  वाटतं  मनात कि  तुम्हा  घेऊन  कुशीत  बिलगावं,
तुमच्या  कप्पाळावरला  घामाला   पदरानं  मी  पुसावं,
तुम्हा  बसवून  सोफ्यावरती  तुमचा  हालहवाल विचारावं,
तुम्ही  हि  हळूच  घेऊन  हातात  हात खेचावं तुमच्या  जवळी,
मी  म्हणावं ढाकाना दार,  कुणी  येईल  भलत्या  वेळी.
पण तुम्ही  लावून बसता विधानसभा, हायकोर्ट, शेअर नि  मंदी,
बातम्या  बघायची  तुम्ही  सोडत  नाही  एकही संधी,
भलतेच  राया  तुम्ही  उदासीन,  माझ्या  उग्गाच  फडफडती  धमन्या,
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.

(कोरस)
दाजी  बंद  करा  टीव्ही,  तुमची  बाईल  आहे  नवी,
तिची  हौस मौज सारी  पुरवा,
तिला  जेवून  झाल्यावरती, न्याना नाक्यावरती,
थंडगार  आयसक्रीम किहो भरवा,
बाई भिरभिरते  वाऱ्यावर,  तिचा  जीव  नाय  थाऱ्यावर,
उगी  कशाला  दाखवताय गुरम्या,
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.

रात्र  चढेल  झोप  येईल,  तेव्हा  खुश्शाल तुम्ही  झोपाल,
शृंगाराच्या  पतंगीचा  दोर  हि कापाल खुश्शाल .
दिसभर  सजवलेल्या स्वप्नांवर कस्सं घालू पांघरून,
हीच  एकांताची  वेळ  सजना  थोडं घ्याना समजून,
काही तरी  करा  घाई, मामी  यायच्या  आत  गावाहून  परतून.
जेवून  झाल्यावरती  रोज  राती  करून  देते  विडा,
सांडते  अशी  अंथरुणात  अंगणी  प्राजक्ताचा सडा,
पण  तुम्ही  लावून  बसता   star  news , zee  news ,
अन  कस्सं  सांगू  आहो  होतो  जीव  पार  वेडा,
आहो  काय ठेवलंय  त्या  बातम्यांमंधी, हीच  वेळ  योग्य  आहे  रमण्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.
तुम्ही  नका  लावू  टीव्ही, बंद  करा  त्या बातम्या.

----------------------------------------------सौम्य

Rahul Kumbhar

केदार मेहेंदळे