व्यथा मराठीची.

Started by dattajogdand, October 24, 2011, 12:05:23 AM

Previous topic - Next topic

dattajogdand




चाल (जिवलगा राहिले रे दूर घर माझे)


जिवलगा.. राहिले रे दूर घर माझे
बोलून थकले, माथ्यावरचे जड झाले हिंदी

............. ‍जिवलगा..



हिंदी बोलते भैया-भाबी

लाज सभोती दाटून येई

सुखकिरणांची विरली छाया, पाचोळा वाजे।... ‍जिवलगा..


मान कालचा मागे पडला

पायदळी तो परक्या चुरडला

ही घटका ती, सुटे मराठी, विजयी ढोल वाजे।... ‍जिवलगा..


निराधार मी माय मराठी

घेशील केंव्हा मज ह्रदयासी

तूच एकला, तार अनाथा, महिमा तव गाजे।.... ‍जिवलगा..

केदार मेहेंदळे