शब्द..................

Started by केदार मेहेंदळे, October 31, 2011, 11:24:23 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

कधी कधी आपल सगळ बोलण, लिहिण निरर्थक आहे, त्यांनी समाजात काहीच  बदल होत नाहीयेत आणि आपण काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याच  कोणाला काही पडल नाहीये अस वाटत. ह्या कवितेत प्रत्येक ओळीत एक शब्द कमी होत गेलाय. प्रत्येक कडव्यात चार, तीन आणि दोन शब्द आहेत. जस्ट काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न.  

किती खर्ची घातले शब्द.
मोठमोठे लिहिले लेख,
मिळवले श्रोते.

किती ठोकली भाषणे.
करण्या समाज जागृती,
मिळविल्या टाळ्या.

किती घातले वितंड वाद.
ज्ञानी अज्ञानी जनात,
जमवुनी मूर्ख.

तरीही न घडले बदल
गेले विरून हवेत
शब्द माझे.

शब्दा मागून शब्द ........ महापूर.
शब्दा शब्दात भरले ...... हलाहल.
शब्दा वरून अपशब्द .... हणामारी.
शब्दा लागली पोखर ..... वाळवी.

जणू उडाला शब्द धुरळा.
उधळला शब्दांचा गाडा,
अर्थ न ज्यात.

जाहले रिते भांडार आता.
वापरतो शब्द जपून,
कवितेत माझ्या.

अन कवितेत होतो व्यक्त.
दाखवतो   विचार वाचून,
स्वता:चे स्वता:ला.


केदार.....