काहीच नाही…...........

Started by RohitDada, November 01, 2011, 11:41:43 AM

Previous topic - Next topic

RohitDada

बोलण्यासारखे खुप आहे,
सांगण्यासारखे काहीच नाही;

करण्यासारखे खुप आहे,
होण्यासारखे काहीच नाही.....
...
कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे,
दुखण्यासारखे काहीच नाही.....

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही.....

तुला नेहमीच वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे,

कळण्यास अवघड काहीच नाही.....
माझ्या नेत्रांतील आसवांची,
तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत,
नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत.

praveen.rachatwar

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर,
बघण्यासारखे काहीच नाही.....
lai bhaari....


केदार मेहेंदळे