सोय - "लग्न"

Started by amoul, November 05, 2011, 12:41:23 PM

Previous topic - Next topic

amoul

तू  फक्त  ओरबडलंस.................. एका  भुकेलेल्या  जनावराप्रमाणे,
मला    त्यात  विवेकी  माणूस  दिसलाच  नाही  कधी.
दिसला  तो  फक्त  वासनांध  राक्षसच.

माझ्या  मऊशार   कोमल   मेहंदीभरल्या   हात्तांना  कुरवाळायाचं   सोडून  कुस्करलस,
माझ्या  नाजुकश्या  पाकळ्यागत   ओठांना  तुझ्या दातांनी  चिरडलस,
आणि   माझं  कौमार्य  तुझ्या  दांडगट  पुरुषपणाखाली  भरडलस.

ज्या   नाजूक  गाठी  प्रेमाने  सोडायच्या  असतातत्या  तू  तोडाव्या  तश्या तोडल्यास,
आणि   वर्षांचा  कुणी  भुकेला  जेवावा  तसं  खात  सुटलास.
जे   पहिल्या  रात्री  तेच  प्रत्येक  रात्री.
मीही   मन  मारून  पडून  रहाते,  समजूतदारपणा  जनावाराकडून  कसला  करायचा.

तू   फक्तओरबडलंस  तेव्हाही जेव्हा  मी  गर्भार  होते,
आणि   तेव्हाही  जेव्हा  किमानतेव्हा  तरी  जेव्हा  खरच  नको  होतं ओरबाडयला.

इतकं   करूनही  तू  समाजातला  एक  आदर्शनवरा,  आदर्श  पुरुष,  आता  तर  आदर्श  बापही होशील.
तुला   तुझा  व्यभिचार  या  आदर्शपणाच्या  ओझ्याखाली मुक्तपणेजाऊन   बाजारात करता  येतनव्हता,
आणि   कुणावर  बलात्कार  करण्याची  तुझी  ताकदच  नाही  तुझ्या  घाबरटपणामुळे,
म्हणूनतू  "लग्न" ही  सोयीस्कर  वाट  निवडलीस.

................अमोल

तुझी आठवण....!

खुपच गंभीर शब्द आहेत....!

संदेश प्रताप


karan jadhav

Kharach veglya angle chi kavita ahe....shabd hi prachand taktiche ahet :-)

jyoti salunkhe

Kharach Khup apratim hrudhyasparshi kavita aahe ....................khup chann :)