सवयच लागलीये...

Started by Sanket Shinde, November 05, 2011, 05:50:13 PM

Previous topic - Next topic

Sanket Shinde

कस काय पाहू शकता तुम्ही होणारा अन्याय? किती सहन करणार तुम्ही अजून?
कि तुम्हाला अश्या जगण्याची सवयच लागलीये...??

असली कसली थट्टा सरकारने मंडलीये
वाढती महागाई हल्ली रोजची झालीये
भुंकणारे मेले भुंकून, तरी आपल्याला काय?
माझ पोट वाढतंय ना? हि गत नेत्यांची हाय...

वाढले दर पेट्रोलचे तर आश्चर्य होत नाही
१२ च्या आत टाकी भरायची मात्र होते घाई
किती दिवस पुरणार ती भरलेली टाकी?
दरमहा पगारातून काही उरतय का बाकी?

संताप करायलाही इथे नाही वेळ कोणाला
मेलेल्यांनाहि जाळतील कदाचित रविवाराला
बांडगुळ बनलेत सारे, दुसऱ्यांवरच अवलंबून
वाट बघतोय मी, कधी क्रोध येणार ओथंबून?   

कधी जाग येणार तुम्हाला सोंग घेणारयांनो?
स्वार्थ थोडातरी बाजूला ठेवा स्वतःलाच विकणार्यांनो...!
शिवरायांचे वारस तुम्ही हिम्मत नाही का लढण्याची?
कि लागलीये सवय... गुलामगिरीतच मरण्याची?

...संकेत शिंदे...

केदार मेहेंदळे