निनावी नाते...

Started by Sanket Shinde, November 05, 2011, 05:53:34 PM

Previous topic - Next topic

Sanket Shinde

काही नाती खूप हवीहवीशी वाटतात पण त्यांना नेमक कोणत नाव द्यायचं हे मात्र नाही काळात आपल्याला... त्या सुखद नात्यांसाठी... निनावी नाते...

ती आवडते मला, मी हि तिला आवडे
हे बोलण्याची गरज आम्हाला कधीच ना पडे
तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे
पण एक अनोळखी मर्यादा नेहमीच नडे

ती सोबत असताना वाटे समयही  स्तब्द व्हावा
तो एक क्षण कधीच पुढे न जावा
जगून घेतो आम्ही सर्व आयुष्य त्या क्षणात
कोणास ठाऊक काय घडणार आहे भविष्यात
   
तीझी सावली जाताच भासे उन्हाची झळ
ती म्हणजे... माझ्या आयुष्यातलं मृगजळ
काही नात्यांना नावांमध्ये नाहीच बांधता येत
काही नात्यांना नावांमध्ये खरच.... नाहीच बांधता येत

...संकेत शिंदे...

MK ADMIN

तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे ??

....
सडे  ??  :)

Sanket Shinde

होय सडे... सडे म्हणजे जमाव... सडणारा सडे नव्हे... ;)

केदार मेहेंदळे

mala vatat ithe sade hya shbdacha arth apan anganat ghalto te kinwa prajktachya fulancha sada ashya arthani "Athvninche sade" asa ahe ka?

Sanket Shinde

#4
होय केदार अगदी बरोबर हेरलात तुम्ही अर्थ...!

yogeshs_3280