"आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे....!"

Started by msdjan_marathi, November 07, 2011, 05:35:43 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

(संक्षेप :आयुष्यात कधीतरी असे प्रसंग येतात, कि तेव्हा, त्यानंतर आयुष्य एका जागी स्थिर राहतं...खूप बिकट परिस्थिती असते ती...! आणि अशावेळी आपली म्हणवणारी लोकंही आपल्याबरोबर रहात नाहीत.... पण आपण मात्र तिथेच उभे राहत असतो... कुणाचीतरी... कशाचीतरी.... वाट पाहत.... वेड्या आशेवर....पण व्यर्थ असतं ते सारं..... आपण जरी थांबलो तरीही वेळ काही आपल्यासाठी थांबत नाही..... तो पुढे सरतंच असतो... अखेर... परिस्थितीला विसरून आपल्यालाच थोडं बदलावं लागतं आणि वेळेबरोबर चालावचं लागतं.... ह्या कवितेतील नायकाचीही अशीच काहीशी अवस्था आहे....!)

:'("आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे....!" :'(

नवं नवं आकाश... नव्या सा-या दिशा...
नवे कोरे बंधं... पुन्हा नव्या आशा...
श्रावणाची चाहूल वैशाख देत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

लोटला एक काळ... संपलं एक पर्व...
स्वप्नांसाठी जागा नाही... आता नवं घर हवं...
ओहोटीही सरलीय... कारण पाणी भरत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

वाटेवरल्या धोंड्यांना फुल समजून वेचलं...
भिरभिरत्या पाखराला जाळ्यात ओढून खेचलं...
धगधग संपली जरी... तरी मन जळत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

उगाळलेल्या चंदनाचे ऋण फिटत नाहीत...
मंद होतात स्पंदने... पण डोळे मिटत नाहीत...
सुकाळलेल्या वेदनांची जाणीव अधरात आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे....! :'(

ह्रिदयाशी कवटाळलेली नाती तुटत आहेत...
तत्त्व आणि नियमांच्या शिदो-या आटत आहेत...
त्राण विरताहेत पावलातले... पण बळ करांत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

रडत्या पडत्या चेह-याला ह्या कुणीतरी हसवलं होतं...
पण... वाळवंटातलं मृगजळचं ते... त्यानेच फसवलं होतं...
धूसर-पुसर वाट मात्र सतत नजरेत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

हसत-हसत कोंडमारा झेलला...
ऊन-पावसाचा खेळही पेलला...
वादळ आणि वावटळातही वात तेवत आहे...!
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(

खूप सारं गमावलं...
त्याहून जास्त कमावलं...
जमवलेल्या अनुभवांची मशाल हाती धरत आहे...
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...! :'(
                                                                     .............महेंद्र :'(







केदार मेहेंदळे

Khupch chan

खूप सारं गमावलं...
त्याहून जास्त कमावलं...
जमवलेल्या अनुभवांची मशाल हाती धरत आहे...
आयुष्य हळूच आता पुढे सरत आहे...!

aprtim....