प्रेम

Started by deshmukhsupriya88, November 08, 2011, 02:02:56 PM

Previous topic - Next topic

deshmukhsupriya88

स्पर्श तो तुझा
मोहीत करतो मला
गंध तो तुझा
बेभान पावसात भिजवतो मला

भुरळ पडते डोळ्यावर
जाते मी क्षितिजावर
बेधुंद हे माझे मन
पळत सुटते गगनावर

प्रीतीच्या त्या क्षणांची
गुंफण घालून ठेऊया
या प्रेमाच्या आठवणी
मनात जपून ठेऊया

तू आणि मी विश्व सगळ तिथेच थांबव
समुद्राच्या या पाण्यात आपण खूप खूप भिजावं

प्रेम कशाला म्हणतात कळण कठीण आहे
आपली ही मन वेगळी कुठे आहेत

का कळत नाही की दिवस लहान पडतो
कळूदेत या जगाला की आम्ही प्रेम करतो

केदार मेहेंदळे


mahesh4812