हरवलेल्या साखळ्या मनाच्या

Started by deshmukhsupriya88, November 08, 2011, 02:05:29 PM

Previous topic - Next topic

deshmukhsupriya88

भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही
डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही
पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत
जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत
सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत
जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत

भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही
मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत
राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत
कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल

हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो
मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल हे काचेच घर
क्षणात तोडून मोकळा होतो ....

केदार मेहेंदळे