माळतेस जेव्हा

Started by शिवाजी सांगळे, September 24, 2025, 03:15:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

माळतेस जेव्हा

गंधाळून जातो भोवती परिसर सारा
माळतेस जेव्हा केसात मोगरी गजरा

कळत नाही कसले आकर्षण वाढते
वळतात फिरून तुझ्या कडेच नजरा

नको वाटते कुणी, गुलाब अन् चाफा
असतांना आसपास दरवळता मोगरा

मोह तुझा की त्याचा हे काही कळेना
जिंकणार मैफिल अंदाज ठरतो खरा

चुकून ओघळता, त्यातून फुल एखादे
गर्दितही हळहळतो दर्दी कुणी बिचारा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९