तू नसते तेव्हा

Started by Mangesh Kocharekar, November 10, 2011, 02:58:13 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

   तू नसते तेव्हा 
  सण नेहमीच येतात तू मात्र कधीतरीच
  मी आनंदी असतो तुझ्या आगमनाने
सारेच काही बदलते तुझ्या अस्तित्वाने   
        तू नसते तेव्हा असते सोबत व्याकूळ मन
        एकले पणाच्या भावनेत चाले मनाचे रुह्दन
        सर्व सुख भोगूनही  मी असतो निर्धन
  तो येतेस आणि घर हसू लागते
बकुळीची वेल अल्लद फुलू लागते
झाडाआडून  कोकीळ कुहू कुहू गावू लागते
      माझ्या मनाचा कोपरा सुखवून जातो
      माझ्या नकळत मी प्रेम गीत गातो
      मागील घटना मी क्षणात विसरून जातो
तू नसतानाची खिन्नता हरवू पाहतो 
तुझ्या नजरेन माझ्या जखमा भरतात
तुझ्या गालावरच्या खळ्या  मला हेच सांगतात
       गत घटना म्हणून मी गाडून टाकतो 
       तुझ्या आसवांशी माझे नाते जोडून टाकतो
       एकलेपणाचा मांड मी तक्षनीच मोडून टाकतो
                               मंगेश कोचरेकर