इथे सावल्यांचा आधार दिसत नाही (गझल)

Started by praveen.rachatwar, November 13, 2011, 02:30:01 PM

Previous topic - Next topic

praveen.rachatwar



आठवणींचा बाजार दिसत नाही
मला इथे माझा यार दिसत नाही

बहुधा विश्वासघाताने मारले
तुझ्या हातात कट्यार दिसत नाही

चालत चालत आलो अशा ठिकाणी
इथे सावल्यांचा आधार दिसत नाही

नियतीचा खेळ काही असा असतो
दिसतो मार तिचा वार दिसत नाही

बहुतेक ती गावात आली असेल
घरात माझ्या अंधार दिसत नाही

मन जिद्दी माझे ऐकणार नाही
तिला भुलण्याचा विचार दिसत नाही

आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का?
'प्रवीण' आज बेजार दिसत नाही

                    - प्रवीण राचतवार